नमस्कार
मुसाफिर,
मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना (जवळ जवळ सात-आठ वर्षापूर्वी) तुमची मुलाखत ( सह्याद्रि वाहिनीवर) ऐकल्या नंतर ईमेल करण्याच ठरवल होत. पण काही कारणास्तव ते राहून गेल आणि ती संधी तुमच्या मुसाफिरीच्या निमित्ताने जुळून आली.
अफाट,
अचाट, अरभाट, अतुलनीय...
आणि अजून बरच
काही जे शब्दात
मांडता न येणार.
तुमच्यावर कौतुकांचा वर्षाव चालूच
आहे आणि तो
असाच चालू राहणार
यात काही शंकाच
नाही. मोठमोठ्या मंडळीनी
पोचपावती दिल्यानंतर मी ते
अजून काय बोलावं
आणि काय लिहावं.
तरीसुद्धा मनापासून खूप खूप
धन्यवाद सर!
मुसाफिरितला
एक एक टप्पा
उलटताना तुम्ही नव्याने उलगडत
गेलात आणि एक
मोठ यान सापडल
ते म्हणजे 'अच्युतयान'.
तुमचा
बराचसा (आणीबाणीचा) काळ हा
मुंबईतलाच. मी स्वतः
मुंबईत राहणारी. त्यामुळे जहांगीर
आर्ट गॅलरी ते
कामाठीपुरा आणि गिरणगाव
ते माहिम इथल्या
सगळ्या गल्ल्या तुमच्या लिखित
अनुभवा बरोबर परत फिरले
आणि काही ठिकाणी
डोळे पाणावले.
समुद्राच्या
लाटांप्रमाणे उंच उसळून
उत्तुंग उंची गाठून
सुद्धा तुम्ही तितकेच नम्र!
तुमचा नम्रपणा मी
अगदी जवळून अनुभवला
आहे. ते चतुरंगच्या
एका कार्यक्रमा निमित्ताने
(सत्यजीत दुबे जीवन
गौरव पुरस्कार , स्वामी
नारायण मंदिर, दादर). तुम्हाला
live ऐकण्याचा आनंद तर
होताच, पण गडबडित
तुमची सही माझ्या
autograph book मध्ये घ्यायच राहूनच गेल.
त्याच अजूनही राहून
राहून वाईट वाटतय.
तो योग पुन्हा
येईल अशी आशा
करते.
खरतर
मी तुम्हाला IT तज्ञ
म्हणूनच ओळखत होते.
पण तुमचा एकंदरित
प्रवास पाहता तुम्ही खरच
एक अफलातून आहात.
माणूस
अस्वस्थ झाला की
तो काय काय
करू शकतो हे
तुमच्याकड़े पाहून कळत. तुमचे
परत एकदा खूप
खूप धन्यवाद (मुसाफिरिसाठी).
तुमची ही मुसाफिरी
अशीच अखंड चालू
राहो त्यासाठी खूप
खूप सदिच्छा!!!
--------
विनया ज. शिर्सेकर