Online वहीच पहिलं पान!!
असंख्य पुस्तक, असंख्य लेख, असंख्य कविता, असंख्य व्यक्ती तशाच वल्ली आणि असंख्य त्यांचे आचार विचार.
असा हा अनमोल खजिनाच आहे. सगळा खजिना उलगडण फार अवघड आहे, पण शक्य होईल तस प्रयत्न नक्की करतेय. वाचून, पाहून, ऐकून, बऱ्याच जणांना व्यक्त ह्वायच असत. आपल्या पिढीला एक नवीन साधन मिळाल आहे.ते म्हणजे "Blog" online वही किंवा (गंधहीन) पुस्तकच म्हणू. जिथे तुम्ही/मी आपले फुकट विचार मांडू शकतो. काही उल्लेखनीय आणि वाचण्याजोगे Blog मी "वाचाल तर वाचाल " ह्या संग्रहात नमूद केले आहेत. वेळ असेल तेव्हा नक्की भेट द्या.
हे अस काही भन्नाट पाहिल्यानंतर मलाही मोह झाला आणि माझी खाजगी वही आता online झाली. चार चौघात मत मांडायचं म्हणजे कोरीव काम करावच लागत. म्हणूनच प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे माझे विचार, थोडस काहीतरी सुचलेले आणि अनुभवलेलं मांडण्याचा एक किरकोळ प्रयत्न मीही करतेय.
वाचकाने लेखातला मजकूर वाचल्यानंतर आपला अभिप्राय (टिपण्या) नक्की कळवा. मग ते चांगल असो किंवा वाईट माझ्यासाठी ते मोलाचाच असेल. वाचकांशी मला संवाद साधायचा आहे वाद नाही.त्यामुळे माझे लिहिलेले विचार पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या. एखाद दुसरा लेख आणि कविता जर कोणत्या दिग्गज कवी किंवा लेखका सारखा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.
ता. क.:
इतर ब्लॉग-करांसाठी एक कळकळीची विनंती.
सध्या उचलाउचलीचा आणि चिकटवाचिकटविचा (copy & paste) चा जमाना आहे. काही वेळेस तुमचे माझे विषय/विचार एकसारखे असू शकतील पण शब्द नाही. म्हणून कोणत्याही ब्लॉगचे मजकूर उचलण्याआधी आणि ते चिकटवण्याआधी विचार करा. धन्यवाद!
-----
विनया ज. शिर्सेकर