तसा माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. पण एकदा अशीच विचार करत
बसले असताना मला काहीस सुचलेलं…
कारण मला वरून सगळ जग पाहाचय !!
पुढच्या जन्मात मला अथांग समुद्र ह्वायचं
कारण मला समुद्रातल्या चिमुकल्या माशांची खेळायचं !!
पुढच्या जन्मात मला सूर्य ह्वायचं
सकाळी उजाडून संध्याकाळी गुडूप ह्वायचं !!
पुढच्या जन्मात मला पाऊस ह्वायचं
मस्त पैकी गरजायचं आणि बरसायचं !!
पुढच्या जन्मात मला वारा ह्वायचं
कारण मला सैरभैर इथे तिथे पळायचं !!
पुढच्या जन्मात मला सूर , ताल , लय ह्वायचं
कारण मला छान अशी संगीत मैफल ह्वायचं !!
पुढच्या जन्मात मला असंच काहीतरी भन्नाट ह्वायचं
पण मनुष्य म्हणून परत जन्माला नाही यायचं ….पण मनुष्य म्हणून परत जन्माला नाही यायचं ….
-----
विनया ज. शिर्सेकर
पुढच्या जन्मात मला वारा ह्वायचं
ReplyDeleteकारण मला सैरभैर इथे तिथे पळायचं !!