अशीच कोणीतरी एक 'ती' आणि तिला आवडणारा 'तो'. तिला नेहमी वाटत फोन करुन त्याच्याशी बोलाव. प्रत्यक्षात तिला कधी ते जमलच नाही. अचानक एक दिवस आईचा निरोप मावशीच्या मुलाला देण्यासाठी ती फोन करते अणि नेमका फोन त्याला लागतो. घटकेभरचा त्या दोघांचा संवाद !!!
ती : (विचारपूस न करता) अरे तू आहेस कुठे?
मावशीला सांग आई आज घरी येणार आहे.
तो : हेल्लो !!
ती : (समोरचा आवाज ऐकून काही सेकंद स्तब्ध. कानाला लावलेला फोन बाजूला काढून पाहिला तर फ़ोन त्याला लागला होता. भानावर आल्यावर बोलायला सुरुवात केली. पण ह्या वेळेस आवाज थोडा दबलेला.) हे हेल्लो I am sorry! तुला चुकून फ़ोन लागला. बर तू कसा आहेस?
तो: मी मजेत, तू कशी आहेस?
ती: काही ख़ास नाही. रोजच्या सारख. कधी छान कधी कंटाळवाण आणि overall ok!.
विचारपूस झाली आता पुढे काय बोलाव दोघांना पण कळेना. एक मोठी शांतता.
हिम्मत करून तीच बोलली.
ती: एक विचारू ?
तो: हो विचार ना, त्यात विचारायचा काय?
ती: नाही नको आपण भेटू तेव्हा बोलू. मग कधी भेटतोय आपण?
तो: हो भेटूयात ना लवकरच. नक्की
ती: (नेहमीच वाक्य ऐकल्यावर परत भानावर आली) ठीक आहे. चल तर फ़ोन ठेवते. काळजी घे.

संभाषण तर इथेच संपल, पण
अजूनही हरवलेल्या वाटेवर ती रस्ता शोधतेय.
अजूनही हरवलेल्या वाटेवर ती रस्ता शोधतेय.
मिळेल तिला वाट???
विनया ज. शिर्सेकर
No comments:
Post a Comment