Sunday, 18 December 2011

खिन्न झाले मी जहाजाप्रमाणे !!


Pic Courtesy : http://desktoplux.com/?lng=ru&id=367





खूप खूप लिहावसं वाटतंय
पण लेखणी आणि शब्द साथच देत नाही
म्हणून लिहावसं वाटतच नाही !!

खूप खूप रडावस वाटतंय
पण कोणी डोळे पुसणारच नाही
म्हणून रडावस वाटतच नाही !!

खूप खूप बोलावस वाटतंय
पण कोणी ऐकणारच नाही
म्हणून बोलावस वाटतच नाही !!

खूप स्वच्छंद निखळ हसावस वाटतंय
पण विनोदातही सध्या कडवटपणा जाणवतोय 
म्हणून हसावस वाटतच नाही !!

समुद्रातील जहाजांप्रमाणे खिन्न झाले
म्हणून काहीच करावसे वाटतच नाही !!

----

विनया ज. शिर्सेकर

No comments:

Post a Comment