वाह, किती छान सुचलंय!
पण छे आता माझ्याकडे लेखणी, कागद काहीच नाही. जेव्हा कधी लिहायचं ठरवते तर त्याच वेळेस सगळे विचार थांबलेले असतात. मग माझ्या समोर असतो तो फक्त असंख्य शब्दांचा पसारा. अशा ह्या विखुरलेल्या शब्द संग्रहात कुठले शब्द वेचावे आणि कशापासून त्याच छान अस वाक्य बनवावं, ह्याच प्रयत्नांत असते. नेमक त्याच वेळेला सगळे शब्द माझ्यासमोर घेर धरून नाचायला लागतात. वेडावून खूप दूर पळून जातात. खरतर भांडावून सोडतात. अशी माझी आणि शब्दांची पकडा पकडी नेहमीच चालू असते. बऱ्याचदा धरपकडीचा खेळ मस्त जमून येतो. दमछाक होते आणि तितकीच मज्जा हि येते.
वाटत कि का कोणी अजून अस यंत्र बनवलं नाही, जेणेकरून डोक्यातल्या आणि मनातल्या विचारांची नोंद ठेवली जाईल. मग नोंद झालेले विचार सहजपणे वहीवर उतरतील.(हे मलाच नाही तर बऱ्याच जणांना वाटत असत)
मला तरी असल यंत्र अजून ठाऊक नाही. तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा!!!
विनया ज. शिर्सेकर
सहज वाटले म्हणून लिहायला सुरु केलेस खर तू......पण तुझ्याच नकळत तू दिलीस माझ्या च विचारांना
ReplyDeleteदिशा.
मला नव्यानेच कळले कि तू इतके सुंदर सुद्धा लिहू शकते... हा तुझ्या गुणाबद्दल मला संशय नाही पण एक नवीन च विनया समोर आली आज माझ्या आणि पुन्हा एकदा तुज्या विचारांचे आणि गुणांचे कौतुक करावे वाटले...
आताच सहज वाटले म्हणून वाचले भले हि ते खूप वेगळे आहे पण तरीही मला हे लक्षात आले कि अरे हे तर मी सगळे पाठी ठेवून आली आहे
मला पण असे लिहावे वाचावे बोलावे असे वाटू लागले आहे आता
खरच सहज वाटले म्हणून वाचले खरे पण सहज स्पर्शून गेले मना
धन्यवाद विनया,
परत आठवण करून दिल्या बद्दल ते सगळ्या ची जे मी पाठी सोडून आले आहे
सहज वाटले म्हणून नेट वर आले खरे मी पण इतके सुंदर अनुभव येईल आज हे जरा सुद्धा मनात आले नव्हत.